Pune NCP : पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजपला टक्कर देण्यासाठी 'मास्टर प्लॅन', राष्ट्रवादीचं नेतृत्व जय पवारांकडे?

Pimpri Chinchwad Politics : जय पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे आता पुण्याची राष्ट्रवादीची सूत्रे जय पवार यांच्या हातात जाणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
Jay Pawar
Jay Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 19 Jul : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर अली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माघारी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार स्वतः मैदानात उतरले आहेत.

जय पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे आता पुण्याची राष्ट्रवादीची सूत्रे जय पवार यांच्या हातात जाणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

जय पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक प्रश्नांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभागातील विकासकामांची सद्यस्थिती आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या कशा पूर्ण करता येतील, याची चाचपणी करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक वाढीबाबत जय पवार यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि पुढील कामांचे नियोजन आखण्यात आले.

स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील संभ्रमावस्था आणि अस्वस्थता

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. आपल्या अडचणी आणि व्यथा नेमक्या कोणाकडे मांडायच्या, याबाबत स्पष्टता नसल्याने पदाधिकारी संभ्रमात आहेत. तसेच, राज्यात सत्तेत एकत्र असले तरी पुण्यात वर्चस्व राखू पाहणाऱ्या भाजपासोबत स्थानिक पातळीवर किती जुळवून घ्यायचं आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी कितपत संघर्ष करायचा, याबाबत स्पष्ट धोरण ठरत नसल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, खासदार पार्थ पवार हे पुण्यातील घडामोडींमध्ये लक्ष घालत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, पार्थ पवार यांनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या निर्णयांसोबत फरफटत जावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सुरुवातीला भाजपच्या निर्णयाला विरोध करायचा आणि नंतर वरिष्ठांचा फोन आल्यानंतर त्याच निर्णयाला पाठिंबा द्यायचा, असा दुहेरी अनुभव पुणे महापालिकेत पाहायला मिळाला होता.

Jay Pawar
Abhijit Dipke : अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या संतापाचा कडेलोट; मोदींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले, "अशा माणसाला..."

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आणि संभ्रमाचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अथवा खासदार पार्थ पवार यांनी नगरसेवकांची बैठक घ्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर जय पवार यांनी ही बैठक घेतली आहे.

पुण्याची धुरा आता जय पवारांकडे?

पक्षांतर्गत निर्माण झालेली हीच संभ्रमावस्था आणि मरगळ झटकण्यासाठी आता जय पवार यांनी थेट पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी स्वतः नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधल्यामुळे, या निमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण सूत्रे आता जय पवार स्वतःच्या हातात घेणार का? आशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Jay Pawar
Tiroda bribery case : लाचखोर भाजप नगराध्यक्षावर गुन्हा दाखल; चक्क हातावर लाचेचा आकडा लिहिला अन्..., ACBच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

नगरसेवकांच्या तक्रारी

या बैठकीमध्ये बहुसंख्य नगरसेवकांनी भाजपच्या धोरणाबाबत तक्रारी केल्या. केंद्रात राज्यात एकत्र असताना महापालिकेत मात्र भाजपचं राष्ट्रवादीला कोणतेही सहकार्य लाभत नाही. उलट कामामध्ये भाजपच्या नेत्यांकडून अडथळा आणला जात असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या.

तसेच जेव्हा एखाद्या ठरावावर भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा आवश्यक असेल तेव्हा भाजप वरिष्ठ नेत्यांशी बोलणं करून पाठिंबा घेत. मात्र जेव्हा राष्ट्रवादीला गरज असते तेव्हा मात्र सहकार्याची भूमिका घेत नाही अशी तक्रार नगरसेवकांकडून सांगण्यात आली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचा आश्वासन जय पवार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com