Nilesh Majhire News, Raj Thackeray latest news, Pune Latest Marathi News  sarkarnama
मुंबई

MNS : पुण्यातील सभेआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का

वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे :अनेक दिवसापासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. २२ तारखेला पुण्यात सभा होणार आहे. या सभेआधी मनसेला मोठा धक्का बसला आहे. (Raj Thackeray latest news)

मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माझीरे यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहिर यांची भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसात माझिरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेला माझीरे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya)दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते.

दौऱ्याच्या स्थगितीचं कारण अस्पष्ट आहे. मनसेकडून अद्याप याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता.

राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता. यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळत होते.

हा दौरा स्थगित झाल्याने वादावर तात्पुरता तोडगा पडला आहे. तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित केल्याचे समजते. डॅाक्टरांच्या सल्लानंतर या दौऱ्याबाबत लवकरच मनसेकडून माहिती देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT