Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

राज ठाकरे म्हणाले, सध्या तरी स्वबळावर..

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजपा (BJP) युतीबाबत सातत्याने चर्चा सुरु होती. आता त्या चर्चेस सध्या तरी पूर्णविराम लागला लागला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे आज (ता.2 फेब्रुवारी) मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस राज्यातील मनसे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. आगामी राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी पक्षाध्यक्ष ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी स्वबळावरच तयार रहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

आगामी निवडणूकीत मनसे सोबत युती होईल की नाही ते पुढे बघू. मात्र, आता त्या भानगडीत न पडता स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहा, असा कानमंत्र ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. काही दिवसांवर आलेल्या महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय कमिटी नेमली जाणार असून ही कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल तयार करुन राज ठाकरेंना देण्यात येणार आहे.

या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, युतीकडे लक्ष न देता आम्हाला आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. भाजप मनसे युती बाबत पूर्णविराम नाही. कोणी हात पुढे केला तर तेव्हा चर्चा होईल. कोणी चर्चा करायला येत असेल तर चर्चेचे दरवाजे खुले ठेवावे लागतात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची टीम प्रत्येक महापालिका क्षेत्रात जाणार आणि तेथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. परंतु निवडणूक होणार की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळी निवडणुकींचे चित्र स्पष्ट होईल तेव्हा मनसेचा जाहिरनामा पुढे येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबईचे महत्व कमी करणे कोणाच्या बापाला जमले नाही आणि यापुढे जमणार नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, विधानसभा लोकसभावार कमिटी स्थापण करून बैठका घेण्यात येणार आहेत. गटाध्यक्ष यांच्या बैठक घेणार कमिटी १५ फेब्रुवारी पर्यंत अहवाल देणार. भाजप सोबत युती बाबात पडू नका असे ठाकरे यांनी सांगितले आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिलेत. शिवसेनेने वॅार्ड रचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही. शिवसेने सोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत का? कितीही वॅार्ड रचना बदलल्या तरी आजचे मरण उद्यावर ढकलंत आहेत. मात्र मरण अटळ आहे. आमचा महाविकास आघाडी विरोधात लढा असेल. असा टोलाही देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT