Ekanath Shinde Advertise News : Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : 'देशात मोदी-महाराष्ट्रात शिंदे', मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती? ; शिवसेनेचा सर्व्हे..

Ekanath Shinde Advertise News : देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्रच्या नाऱ्याचं काय?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आज राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकलेली जाहीरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशा आशयाचे फलक-हेर्डिंग्ज्स दिसत होते. मात्र आता देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाच्या मथळ्याखाली जाहीराती प्रसिद्ध होत आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. (Deshat Modi Maharashtrat Shinde News)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला ३०.२ टक्के तर शिवसेनेला १६.२ टक्के लोकांनी पंसंती दिली आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.०२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या जाहीरातीत फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी अधिक पसंती दिल्याचे या जाहीरातीत नमूद केले आहे. यामुळे शिवसेनेने भाजपवर या जाहीरातीच्या माध्यमातून कुरघोडी केली आहे का? अशी चर्चा होत आहे.

नुकतंच कल्याण - डोंबिवलीमध्ये भाजप - शिंदे गटात जो काही मतभेद उभारून आला आहे, या मतभेदाची पार्श्वभूमी असतानाच या जाहीरातीची आता चर्चा होत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिनाच्या नजीक येऊन ठेपले आहे. शिवसेना गटांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एका सर्व्हेचा दावा करून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे जास्त लोकप्रिय असल्याचा या जाहीरातीत सांगितले गेले आहे. असं सांगणं हे एकप्रकारे दबावतंत्राचा अवलंब शिंदेंची शिवसेना करू पाहतेय का? अशी चर्चा आहे.

शिवसेनेशिवाय भाजपला पर्याय नाही असा एक संदेश देण्याचा शिवसेनेचा यातून प्रयत्न आहे का? असेही याकडे पाहिले जात आहे. अचानक पद्धतीने या जाहीराती येणं, या जाहीरातीत भाजप आणि शिवसेना यांच्या मतांची टक्केवारी नमूद करणे, यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकायच्या असतील तर शिवसेनेच्या मतांशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं सुचवण्याचा शिंदे गटाच्या प्रयत्न असू शकतो. दबावतंत्राची एक पद्धती शिंदे गटाकडून खेळली केली जात आहे, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT