Eknath Shinde News : शिंदेंच्या शिवसेनेत सरपंच-उपसरंपंचासह 500 जणांचा प्रवेश; पालघरमध्ये..

Eknath Shinde Shivsena News : "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे लोक येत आहेत," ; मुख्यमंत्र्यांची भावना..
Eknath Shinde News :
Eknath Shinde News : Sarkarnama
Published on
Updated on

Palghar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितित शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये (Shivsena) पालघर जिल्ह्यातील विविध पक्षातील ६ सरपंच आणि ६ उपसरपंचसहित ५०० पदाधिकारी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यामुळे पालघर जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. यावेळी शिंदेंनी सर्वांचं स्वागत करत बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचाराकडे लोक जोडले जात आहेत, अशी भावना व्यक्त केली. (Latest Marathi News)

Eknath Shinde News :
Sanjay Raut News : संजय राऊतांनी ठोकला सोमय्यांवर दावा; लवकरच सुनावणी होणार..

पालघरमधून एवढ्या मोठ्या संख्येने आपण प्रवेश केला. या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो. आता या ठिकाणी पाऊस पडतो आहे ही चांगली गोष्ट आहे. वरुणराजा ने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. आता आपल्या पक्षात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आपल्या युती विषयी विश्वास वाढला आहे. आपल्या पक्षात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर विश्वास असलेली लाखो लोकं रोज जोडली जातायेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आता देशारल्या 24 राज्यांमध्ये संघटन प्रमुखांची बैठक घेतली आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम सुरू झाले आहे. काश्मिरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता येत नव्हता पण, आता केंद्रात असलेले मजबूत नरेंद्र मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे आता लाल चौकात देखील तिरंगा फडकवण्यात आला. आता तिथे पूर्वीसारखं वातावरण नाहीये मोकळं वातावरण आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde News :
Ram Shinde Death Threat: मोठी बातमी! राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक

बाळासाहेबांचे दोन स्वप्न पूर्ण होत आहेत. एक म्हणजे काश्मीर प्रश्न आणि दुसरं राम मंदिर. आता हे दोन्ही स्वप्न पूर्ण होत आहेत. यासाठीच आपण युती केली होती. पूर्वीच्या सरकारने सगळ्या विकास कामावर ब्रेक लावला होता, पण आता आमच्या सरकारने विकास कामांवर लावलेले सारे ब्रेक हटवले आहेत, असेही शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com