Sanjay Raut & Mohit Kamboj
Sanjay Raut & Mohit Kamboj Sarkarnama
मुंबई

फडणविसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोजकडून राऊतांनी उसने पैसे घेतलेत!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता.15 फेब्रुवारी) शिवसेना (Shivsena) भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) बुडवणार, असे म्हणत राऊत यांनी कंबोज यांच्यावर मोठा आरोप केला आहे. पत्राचाळीबद्दल बोलतांना राऊत म्हणाले की, ती जमीन खरेदी करणारा कंबोज असून पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे तिथेच गुंतले आहेत. तिथे कंबोजचाच प्रोजेक्ट सुरु असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांच्या आरोपांचे खंडण करत राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

कंबोज म्हणाले, राऊत म्हणाले म्हणतात की, मी मोहित कंबोजला ओळखत नाही. मात्र, ते 4 सप्टेंबर 2017 ला माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी गणपतीला येतात. जेव्हा त्यांना आर्थिक मदत लागली तेव्हा मी त्यांना मदतही केली आहे. माझ्यावर त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर मी देणार आहे. याबरोबर 175 एकर लँड खरेदी केली तो 5 हजार करोडचा हा व्यवहार आहे. प्रवीण राऊतला 700 कोटी मिळाले यात संजय राऊतांना किती कट मिळाला. स्मगलर लोकांसोबत तुमचे संबंध काय आहेत. राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले. गोल्ड स्मगलरसोबत तुमचे संबंध काय आहेत? संजय राऊत आणि हयातचा काय संबंध? राजकुमार गुप्ता कोण हे देखील त्यांनी सांगावे. याबरोबर कोविड सेंटरमधील पार्टनरसोबत तुमचे काय संबंध आहेत,असे गंभीर आरोप कंबोज यांनी राऊतांवर केले आहे.

माझ्यावर केलेल्या आरोपांवर बोलतांवा कंबोज म्हणाले की, मी संजय राऊत याना लीगल नोटीस पाठवणार आहे. ज्या पद्धतीने नवाब मलिक यांना तोडावर आपटावे लागले तसेच, राऊत यांच्यासोबत देखील झाले आहे. मला त्यांनी फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा एक छोटा बॉय म्हटले. माझा राऊतांना सवाल आहे की ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू आईड बॉय आहेत की, शरद पवार यांचे?, असा सवाल करत कंबोज यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT