संजय राऊतांच्या एकपात्री प्रयोगाने हसून हसून राजकारण्यांच्या पोटात मुरडा आला असेल..

शिवसेना भवनात झालेल्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत साडेतीन शहाणे कोण? याचा सस्पेन्स कायम राहिला. (Chandrakant Patil, Bjp)
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : `संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणंच धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली`, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली. (Shivsena) राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा, असा चिमटाही त्यांनी काढला. (Maharashtra)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी `साडेतीन शहाणे`, तुरुंगात जातील असे सांगत आपल्या पत्रकार परिषदेने अनेकांची झोप उडणार आहे, दिल्लीतल्या नेत्यांनी देखील ती बघावी, त्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसेना भवनात होणाऱ्या या पत्रकार परिषदेत कोणता बाॅम्ब फुटणार याकडे देशाचे लक्ष लागले होते.

शिवसेना भवनात झालेल्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत साडेतीन शहाणे कोण? याचा सस्पेन्स कायम राहिला असला तरी संजय राऊत यांनी ईडी व भाजपच्या काही नेत्यांवर थेट नाव घेत आरोप केले. या पत्रकार परिषदेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी भाजपने मात्र राऊत यांचा हा फुसका बार, ट्रेलरमध्येच फ्लाॅप झालेला पिक्चर असे म्हणत टीका केली आहे.

Chandrakant Patil-Sanjay Raut
Sanjay Raut VS BJP : फडणविसांवर पहिल्यांदाच इतका मोठा आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करणारे ट्विट केले. राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे एकपात्री प्रयोग होता, कारण यात प्रश्नोत्तरेच झाली नाही, असा टोला त्यांनी लगावला. हा एकपात्री प्रयोग पाहणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली, असे सांगतानांच राजकारण्याच्या पोटात हसून हसून मुरडा आला असेल, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com