Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : 'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत'! भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Mohit Kumboj : आगामी विधानसभा निवडणुकीतपूर्वी सत्ताधारी-विरोधकांतील नेत्यांच्या विधानांनी राज्यातील वातावरण तापले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांना, 'एक तर तुम्ही राहाल नाही तर मी. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमची गुर्मी उतरवतो', असे खुले चॅलेंज दिले आहे. तसेच लोकसभेत, मी असा नडलो की मोदींनाही घाम फुटला, असा निशाणाही भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला.

ठाकरेंच्या या भाषेमुळे भाजपचे नेते चांगलेच संतापले आहेत. ठाकरेंच्या या चॅलेंजला भाजप नेते मोहित कुंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईत ठाकरे गटाचा मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यावर मोहित कुंबोज यांनी, उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी बांगड्या भरल्या नाहीत. आम्हालाही जशास ते उत्तर देण्यास येते, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी टशन दिसण्याची शक्यता आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी त्यांच्यावर फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी दबाब आणल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत त्यांच्याकडे पुरावे असल्याचाही दावा केला आहे.

त्यावर ठाकरे यांनी फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, पैसा नाही पण, माझ्याकडे फक्त शिवसैनिक आहेत. या शिवसैनिकांच्या जीवावर सांगतो, की आता तू तरी राहशील नाही तर मी तरी, असे नाव न घेता ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष्य केले.

सर्व यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतानाही लोकसभेत पंतप्रधान मोदींना घाम फोडल्याचा टोलाही ठाकरेंनी लगावला. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक आपण असे लढलो की मोदींनाही घाम फुटला. त्यांचे भाषण ऐकताना कीव येत होती.

आपल्यासाठी हे शेवटचे आव्हान आहे, असे म्हणत ठाकरेंनी Uddhav Thackeray विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहनही केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिवसेना आणि भाजप यांच्यात घमासान होण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT