Police arrest accused priest in Dombivli molestation case involving a 5-year-old girl sarkarnama
मुंबई

Dombivli Crime : माणुसकीला काळीमा! पाच वर्षीय मुलीचा विनयभंग; पुजाऱ्याला अटक!

Dombivli child molestation case police arrest priest: शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli News : शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीसोबत 45 वर्षीय पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली असून, या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. आरोपी पुजारी हा त्यांच्या शेजारीच वास्तव्यास आहे. 15 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान, मुलीचे पालक कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपीने घरात येऊन चिमुरडीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक टी. एस. पवार यांनी तपास हाती घेतला. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली.

सध्या त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू असून, घटनेचे नेमके स्वरूप आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकांनी मुलांशी संवाद ठेवून त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT