Monsoon session News : News Parliament Building Sarkarnama
मुंबई

Monsoon session News : पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात; नव्या संसद भवनात होणाऱ्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय?

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने पावसाळी अधिवेशन संदर्भात (Parliament Mansoon Session) केंद्राच्या कॅबिनेट समितीच्या लवकरच होणार बैठक होणार आहे. ज्यात संसदीय पावसाळी अधिवेशनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात (Defense Minister Rajnath Singh) नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, यंदाचे संसदीय पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2023) हे येत्या 17 तारखेपासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन हे १० ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. लवकरच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची अधिकृत घोषणा होणार आहे.

या मुद्द्यांवरुन होणार अधिवेशनात गदारोळ -

यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अधिवेशनात (Parliament Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील केंद्र आणि राज्य असा द्वंद निर्माण झालेल्या ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणी नायाब उपराज्यपाल यांना अधिकार देण्याच्या विधेयक संसदेतील घमासानाचे कारण ठरू शकते.

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) देशभरात फिरत विरोधी पक्षांचे यावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध पक्षांचे त्यांना या मुद्द्यावर पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मात्र काँग्रेसने या मुद्द्यावर (Congress) 'आप'ला अजूनही स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नाही. मात्र पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच सिव्हिल युनिफॉर्म कोड म्हणजे समान नागरी कायद्याचे विधेयक देखीस याच अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचे विधेयक सभागृहात येऊ शकतो, यावर सगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या भूमिका असल्याने, यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो.

नव्या संसदेतील पहिलेच अधिवेशन :

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे, नवीन संसद भवनात (New Parliament Building) होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं नुकतंच उद्धाटन झालं होतं. दिल्लीस्थित नव्या संसद भवनात प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र कार्यालय असणार आहे. याशिवाय प्रत्येक पक्षाला देखील वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT