Vishwajeet Kadam News : विश्वजीत कदम भाजपात जाणाच्या चर्चांना सिद्धरामय्यांच्या सभेमुळे पूर्णविराम?

Vishwajeet Kadam On BJp : "मला सांगली लोकसभा, विधानसभा जिंकायची आहे.."
Vishwajeet Kadam News :
Vishwajeet Kadam News :Sarkarnama

Sangli News : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार अशी शक्यता मध्यंतरी राजकीय वर्तुळातून उमटत होती. सांगली जिल्ह्यामध्ये (Sangli Congress) काँग्रेस पक्षाला कुणी वाली राहिला नाही, अशीही चर्चा होत होती. मात्र कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या एका सभेने या सर्व चर्चांवर पु्र्णविराम लागल्याची चर्चा सांगलीत होत आहे.

Vishwajeet Kadam News :
Maharashtra Cabinet : खूश खबर ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठा निर्णय; 'या' २८ महत्वांच्या घोषणा

सिद्धरामय्या यांच्या सभेने काँग्रेसमध्ये पुन्हा उर्जा निर्माण झाली आहे. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांची तोंडे बंद झाली. सांगली काँग्रेसमध्ये कदम गट आणि दादा गट असा सावता सुभा असल्याचे बोलले जात होते. मात्र काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांचे नेतृत्व सीकारले आहे, यामुळे गटबाजीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे, अशी सांगलीतील काँग्रेसमध्ये चर्चा आहे.

Vishwajeet Kadam News :
Rahul Gandhi Photo's : ट्रक प्रवासानंतर राहुल गांधी बनले 'गॅरेज मॅकेनिक'; नवा अवतार पाहिलात का? पाहा खास फोटो!

काँग्रेसच्या महानिर्धार मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी ‘मला सांगली लोकसभा, विधानसभा जिंकायची आहे’, हा निर्धार व्यक्त केला. यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपला तगडी लढत मिळण्याची चिन्हे या सभेतून मिळाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगतदार होणार, याची झलक या सभेत दिसली. अस्तित्वाच्या लढाईला काँग्रेस सज्ज झाल्याचे दिसून आले.

(Edited BY - Chetan Zadpe)  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com