MP Amol Kolhe News Sarkarnama
मुंबई

MP Amol Kolhe News : फुटीनंतर राष्ट्रवादी अॅक्टिव्ह मोडवर; खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी

Sharad Pawar News : अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा आणि विधासभेच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी कोल्हे याना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला. पाच जुलै रोजी झालेल्या शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला ते वाय. बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे उपस्थित होते.

त्यावेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जोरदार पणे बाजू मांडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांना तुमी पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा, असे म्हटले होते. त्यामुळे कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये मोठी जबाबदारी येणार असे सांगितले जात होते.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेतली होती. ही सभा अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणाने चांगलीच गाजवली होती. तसेच या दौऱ्यादरम्यान, झालेल्या शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे ओबीसी नेते होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर शरद पवार यांनी सांगितले होते, 'की अमोल कोल्हे यांच्याशी बोलताना त्यांना सामाजीक काम करायचे आहे, असे जाणवले. त्यांना मी राष्ट्रवादीत येण्याचा आग्रह केला. तो आग्रह स्वीकारुन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनोल कोल्हे शिरुर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.'

त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आता त्यांची प्रचार प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शरद पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात येत आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT