औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत नामांतराची गरज काय, ते संभाजीनगरच आहे, असं ठणकावलं. तर त्याला प्रत्युत्तर देताना रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता भाजप सत्तेत आल्याशिवाय नामांतर होणार नाही, असं म्हटलं. त्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोघांनाही आव्हान दिलं आहे. (MP Imtiaz Jaleel Latest Marathi News)
माध्यमांशी बोलताना जलील यांनी दोघांवरही टीका केली आहे. औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न आधी सोडवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब हे धंदे बंद करा. समाजा-समाजात तुम्ही तेढ निर्माण करत आहात. तुम्हाला देशाशी, महाराष्ट्राशी, औरंगाबादशी काही देणंघेणं नाही. फक्त सत्तेसाठी हे सगळं सुरू आहे. (MP Imtiaz Jaleel criticizes CM Uddhav Thackeray and Devendra Fadnavis)
तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर पाणी आणा. त्याबाबत बोला. हिंमत असेल तर कोणत्याही भागात एकटे फिरा. तिथल्या माता-भगिनींना भेटा. त्यांनी तुम्हाला हाणलं नाही तर मी तुम्हाला सांगतो. दहा-पंधरा वीस गाड्या घेऊन फिरू नका. कोणत्याही भागामध्ये तुम्ही फिरा तुम्हाला पळवून लावतील, असं आव्हान देत जलील यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट केलं.
फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना जलील म्हणाले, औरंगबादला आता पाणी हवे. आज भाजपला सांगा, त्यांनी त्यांच्या भागात जाऊन माता-भगिनींना विचारा त्यांना पाणी हवे की नामांतर. त्या पाण्याचा हंडा त्यांच्या डोक्यावर हाणतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशाप्रकारचे जे नेते आहेत, जे स्वत:ला खूप मोठे समजतात, ज्यांनी देशाची वाट लावली आहे. आज भाजपने या देशात केवळ सत्तेत बसण्यासाठी घाणेरडे खेळ खेळत आहेत. त्यात देवेंद्र फडणवीसही एक खेळाडू आहेत. आमच्यासाठी आमच्या शहराला पाणी महत्वाचे आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांना वेळ आल्यानंतर उत्तर देऊ, असं जलील यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.