PI अनूप डांगे यांचा लेटरबॉम्ब; नवलानी प्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं, आयुक्तांना 31 पानांचं पत्र

अनुप डांगे यांनी यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
PI Anup Dange
PI Anup DangeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनूप डांगे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 31 पानी पत्र लिहून पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. उद्योजक जितेंद्र नवलानी प्रकरणात योग्य तपास झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच पोलिसांना मारहाण आणि कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी डांगे यांनी केली आहे. (Anup Dange Latest Marathi News)

अनुप डांगे यांनी यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. नवलानी हा परमबीर यांचा साथीदार असल्याचा दावाही केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर पोलीस नवलानीचा शोध घेत असून त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही बजावली आहे. (PI Anup Dange's letter to Police Commissioner Sanjay Pandey)

PI Anup Dange
कल ‘हल्का’ कर दिया..! अमृता फडणवीसांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी जितेंद्र नवलानी याच्या बारवर डिसेंबर 2019 मध्ये छापा टाकला होता. यावेळी नवलानी व इतरांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याला गुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 12 एप्रिल रोजी दिला. डांगे यांनीच ही कारवाई केली होती. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे आला होता.

अनूप डांगे यांचे आरोप

तपास अधिकारी असलेले पीआय किशोर शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी योग्यप्रकारे तपास केला नाही. नवलानी याला फायदा करून देण्यासाठी तपासात उणिवा ठेवल्या. मी पोलीस ठाण्यात असेपर्यंत त्यांनी घटनेच्या ठिकाणी भेट दिली नाही. साक्षीदार हे नवलानी याचे अनेक वर्षांचे मित्र आहेत. पोलिसांची साक्ष घेतली नाही, असे आरोप डांगे यांनी पत्रातून केले आहेत.

PI Anup Dange
काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार रहा! काश्मिरी पंडित, 'आरएसएस'ला आलेल्या धमकीनं खळबळ

त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी विनंती डांगे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. पीआय किशोर शिंदे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आपण आणखी एक चपराक खाण्याची वाट पाहणार की याबाबत काही करणार आहोत की नाही, असा सवाल डांगे यांनी केला आहे. डांगे यांनी हे पत्र नऊ मे रोजी लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com