Navneet rana, Sanjay Raut News, Navneet rana latest Marathi News
Navneet rana, Sanjay Raut News, Navneet rana latest Marathi News  Sarkarnama
मुंबई

नवनीत राणांची थेट दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडं धाव; राऊतांना आणणार अडचणीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या खासदारांनी पुन्हा लोकसभेत पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांना दिलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशाचा फोटो शेअर करत नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा दावाही केला आहे. 'हे लोक fraud..bogus, आम्हाला हनुमान चालीसा पाठ ऐकवणार', असंही राऊत यांनी ट्विट केलं होतं. माध्यमांसमोर त्यांनी याबाबत सातत्याने वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राणा यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे. (Navneet rana latest Marathi News)

आमदार रवी राणा (Ravi Rana) व नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवनीत राणा यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपला पोलीस ठाण्यात छळ झाल्याची तक्रार केली आहे. त्यावरून बराच वादही निर्माण झाला आहे. त्यानंतर आता त्यांनी संजय राऊतांची तक्रार दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मी विशिष्ट जातीची आहे, हे माहित असूनही ते आपली बदनामी करत आहेत. त्यांच्यावर अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राणा यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मी अनुसूचित जातीची असून शिवसेनेविरूध्द निवडून आले आहे. त्यामुळे शिवसेना नेते, कार्यकर्ते मला धमकावत आहेत. माझ्या जातीबाबत खोटे आरोप लावत आहेत. मी निवडून आल्यावर संजय राऊत वारंवार माझ्या विरोधात बोलत आहेत. मी एका विशिष्ठ जातीची आहे, हे माहित असूनही माध्यमांना मुलाखती देतात. माझे पती आणि माझ्याबाबत बंटी आणि बबली असं बोलतात. माझ्या घराखाली शिवसैनिकांनी आंदोलन केले, घराला वेढा घातला होता. त्यामुळे संजय राऊत आणि कार्यकर्त्यांविरूध्द अॅट्रॉसिटीअंतर्गत तक्रार दाखल करावी, अशी विनंती राणा यांनी केली आहे.

उच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द

अमरावती हा लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र, खासदार नवनीत कौर यांनी लुहाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यांच्या या जात प्रमाणपत्राला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. काही महिन्यांपूर्वी0 मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच आधारावर राऊतांकडून टीका केली जात आहे.

याचिकेमध्ये म्हटले होते की अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. पण नवनीत राणा या लुहाणा जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहेत. असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने राणा याचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीसाही बजावल्या. अद्याप त्यावर अंतिम निकाल लागलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT