नवनीत राणांना ईडी 'चहा' पिण्यासाठी कधी बोलावणार? राऊतांचा टोमणा

डी गँगला का वाचविलं जात आहे, यावर भाजपचे मौन का?'
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News, Sanjay Raut on Navneet Rana
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut on Navneet Rana sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्या अडचणींमध्ये शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आणखी भर घातली आहे. सध्या राणा या न्यायालयीन कोठडीत आहेत. राणांचं डी गॅंगशी असलेले कनेक्शन काल राऊतांनी उघडकीस आणले आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

आज राऊतांनी टि्वट करुन राणा यांना ईडी 'चहा' पिण्यासाठी कधी बोलवणार, अशा खोचक शब्दात टोला लगावला आहे. ईडी (ED) राणांची चौकशी करणार का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांच्या राणा एज्युकेशन सोसायटीला युसूफ लकडावाला या व्यक्तीने 80 लाखांचं कर्ज दिल्याचं संजय राऊत यांनी काल टि्वट करुन सांगितले होत.

navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News, Sanjay Raut on Navneet Rana
MNS : असा आहे मनसेचा 'आर प्लान'; कार्यकर्ते सज्ज

'दोनशे कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात युसूफ लकडावाला याला ईडीनं अटक केली होती, जेलमध्ये असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या बेकायदा कमाईचा काही हिस्सा नवनीत राणा यांच्या बँक खात्यात आहे. ईडी आता राणांना चहा पिण्यासाठी बोलविणार का? या डी गँगला का वाचविलं जात आहे, यावर भाजपचे मौन का?' असा सवाल राऊतांनी टि्वट करुन विचारला आहे.

navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News, Sanjay Raut on Navneet Rana
भडकावू भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर कारवाई का नाही ; अबू आझमींचे गृहमंत्र्यांना पत्र

राऊत यांनी राणांचे एक अॅफिडेव्हीट मंगळवारी शेअर केले आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

'आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यात छळ करण्यात आला. मी खालच्या जातीची असल्याने मला बाथरूम वापरण्यास मनाई करण्यात आली,'असे ट्विट करून नवनीत राणा यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com