Eknath Shinde, Vinayak Raut sarkarnama
मुंबई

2003 मध्ये शिंदेंबाबत चूक झाली; राऊतांची खंत : ठाण्यात ठाकरेंच्या यात्रेला जोरदार प्रतिसाद

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबतीत २००३ मध्ये आमची चुक झाली, विनायक राऊतांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबतीत २००३ मध्ये आमची चुक झाली. सतीश प्रधान यांना त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी तो फॉर्म एकनाथ शिंदे यांना दिला. तेव्हा आमच्याकडून चूक झाली. मात्र, आज त्यांनीच गद्दारीची बीजे रोवली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

शिवसेनेच्या महाप्राबोधन यात्रेत ते ठाण्यामध्ये बोलत होते. शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आजपासून सुरू झाली. या यात्रेची सुरूवात आज ठाण्यातील टेंभी नाका येथून झाली. यावेळी शिवसेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत व सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधीत केले. या वेळी बोलताना राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला.

जी चूक केली ती चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याला आहे, असे राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. त्यावेळी हे गुवाहाटी येथे दारू पिऊन नाचत होते, असा आरोप त्यांनी केला. बीकेसीवर ज्या थोर पुरुषाचे भाषण झाले, त्यांचे भाषण ऐकून मंत्री झोपले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊत यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेना स्थापना झाली त्यावेळी तुम्ही काय करत होतात? आपली उंची किती, आपण बोलतो किती, अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि बिर्जे ताई आम्हाला तुमचा अभिमान असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT