सत्ता गेली, पक्षाचं नाव आणि चिन्हही गेलं, आता पुढं काय ?

Shivsena : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक शिवसेेनेला मूळचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाशिवाय लढावी लागणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेच्या (Shivsena) स्थापनेपासून गेल्या ५६ वर्षातली अत्यंत बिकट स्थिती पक्षावर पहिल्यांदाच आलीय. तीन महिन्यांपूर्वी सत्ता गेली. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्याने शिवसेनेवर मोठं संकट ओढावलं आहे.यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष कसा उभा करणार, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) माध्यमातून राज्य आणि केंद्रातल्या सत्तेने उभे केलेले आव्हान ठाकरे कसं पेलणार हा खरा प्रश्‍न आहे.

Uddhav Thackeray
राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी; मी योग्यवेळेस भूमिका मांडेन

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक शिवसेेनेला मूळचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाशिवाय लढावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेला नव्या नावाची व चिन्हाची गरज लागणार आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे तर त्रिशूळ, मशाल व उगवर्ता सूर्य ही तीन चिन्ह ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाला सुचविण्यात आली आहेत.

Uddhav Thackeray
Ajit Pawar video : '१४५ चा आकडा लागला पाहिजे फक्त!"

मूळ नाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर ठाकरे यांनी मागितलेल्या नव्या तीन चिन्हांबाबतही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. त्रिशुळ हे शस्त्र असल्याने ते मिळण्याची शक्यता नाही.उर्वरित उगवता सूर्य व मशाल ही दोन चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण होऊ शकतो. ठाकरे यांनी सुचविलेली तीन्ही चिन्हं नाकारली तर त्यांना पुन्हा नव्या चिन्हांची मागणी करावी लागेल.

Uddhav Thackeray
मनसेनं बॅनरबाजी करून शिवसेना आणि शिंदे गटाला डिवचलं...

संकट हीच संधी असते. या संधीच सोनं मी करून दाखविणार आहे, असा आत्मविश्‍वास ठाकरे यांनी आजच्या फेसबूक लाईव्हमध्ये बोलून दाखविला. नजीकच्या राजकीय वाटचालीत ठाकरे यांना प्रत्यक्षात संघर्षच करावा लागणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत ठाकरे यांचा खरा कस लागणार आहे. या निवडणुकीनंतर लगेचच मुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी अंधेरीची निवडणूक ठाकरे यांना जिंकावी लागणार, हे निश्‍चित.

यापुढचा राजकीय प्रवास ठाकरे यांना राष्ट्रवादीबरोबर आणि कॉंग्रेस सोबत आली तर या दोघांबरोबर करावा लागणार आहे. एकिकडे हिंदुत्वाचा बाणा कायम ठेऊन विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसबरोबर महाविकास आघाडीत राहण्यासाठी ठाकरे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचा परिणाम शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर होऊ शकतो. ही बाब ठाकरे यांच्यासाठी काहीशी अडचणीची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com