संजय राऊत

 

सरकारनामा

मुंबई

नीतेश राणेंच्या विषयात खासदार राऊत म्हणाले; यावर मी बोलणं बरं नाही

भारतीय जनता पार्टीला देणगी द्या असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नैतिकतेचा भंग केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्यावरील कारवाई ही कायदेशीर बाब आहे. त्या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत. ते काय ते पाहतील या विषयात मी फार बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.

सिंधूदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्चविली जात आहे. या पाश्‍र्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार राऊत बोलत होते.सिंधूदूर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते पाहून घेतील, असे सांगत खासदार राऊत यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.

भारतीय जनता पार्टीला देणगी द्या असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिकतेचा भंग केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. पंतप्रधान हा देशाचा असतो.तो कुणा पक्षाचा नसतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या पक्षाला देणगी देण्याचे आवाहन करणे योग्य नसल्याचे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.देशाच्या पंतप्रधानांकडून एखाद्या विशिष्ट पक्षाला देणग्या देण्याचे आवाहन केले जाते.यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, आपले राज्यपाल अभ्यासू आहेत.प्रत्येक गोष्टीचा गेल्या एक वर्षापासून अभ्यास करू लागले आहेत."शांतता अभ्यास सुरू आहे".असं नाटक सुरू झालं आहे. ते आणखी काही दिवस सुरू राहणार आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

बारा आमदारांच्या नियुक्तीचा विषय गेल्या वर्षभराहून अधिका काळपासून सुरू आहे. राज्यसरकारने सर्व पातळ्यांवर प्रयत्न करूनही राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी या विषयात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारचा रोष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT