MP Ravindra Waikar
MP Ravindra Waikar Sarkarnama
मुंबई

Video Shiv Sena News : रवींद्र वायकरांना लोकसभेचे खासदार म्हणून शपथ देऊ नये, हे आहे कारण.. !

Chaitanya Machale

Mumbai News : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार झालेले रवींद्र वायकर यांचा निवडणुकीतील विजय संशयास्पद आहे. त्यांचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना तेथे मोबाईल घेऊन हजर असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी यामध्ये एफआरआय देखील दाखल केला आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे. त्यामुळे वायकर यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देण्यात येऊ नये, अशी नोटीस लोकसभेच्या सरचिटणीसांना देण्यात आली आहे.

वायकर यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शाह यांनी आपले वकील असीम सरोदे यांच्यामार्फत लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवून खासदार वायकर यांना शपथ न देण्याची मागणी केली आहे. लोकसभा सरचिटणीस उत्पलसिंग यांना इमेल द्वारे देखील हे नोटिसीपत्र पाठविल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे वायकर यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला आहे.

लोकसभा (Lok Sabha) सरचिटणीस यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे, देशात पहिल्यांदा ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे विजयाचा दावा करणारे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे असे ठरेल. यापूर्वी अशी मागणी कुणी केली नसेल तरीही आपण शपथ देण्यामागील संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, असे यामध्ये म्हंटले आहे.

वायकर यांचा नातेवाईक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन उपस्थित होता. हा मोबाईल ईव्हीएम मशीनबरोबर जोडलेला होता, असा आरोप झाल्यावर पोलिसांनी यामध्ये एफआयआर दाखल करून चौकशी सुरू केली आहे. ईव्हीएम द्वारे होणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत ठरवून व काही निवडक मतदारसंघात गैरवापर करायचा, त्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि भाजप ला सोयीचा निकाल येण्याची व्यवस्था करायची अशी चर्चा यापूर्वी वारंवार झाली आहे. मात्र पहिल्यांदाच यामध्ये पोलिसात तक्रार झाली आहे, असे भरत शाह यांनी सांगितले.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील नेस्को सेंटर या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे, ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व केंद्र सरकारच्या दबावाखाली मदत करीत आहेत. असा आरोप भरत खिमजी शाह यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT