Video Uddhav Thackeray : 'ते' पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी, भर मेळाव्यात बोलले...

Shivsena Foundation Day 2024 : स्वत:चं अपयश झाकण्यासाठी उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याची अफवा पसरवली जातेय. आपण एनडीए सोबत जाणार नसल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama

Shivsena News :उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह एकनाथ शिंदेवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, काही ठिकाणी झालेले पराभव आपल्या जिव्हारी लागल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कुठले पराभव जिव्हारी लागले हे जरी उद्धव ठाकरेंनी सांगितले नसले तरी ठाणे, संभाजीनगर, कोकण आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातील पराभव हे उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भाजपसोबत जातील, असा चर्चा होत असताना ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला. आपण त्यांच्यासोबत जायचं का? असा प्रश्न विचारत स्वत:चं अपयश झाकण्यासाठी उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याची अफवा पसरवली जातेय. आपण एनडीए सोबत जाणार नसल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले.

 Uddhav Thackeray
Shivsena Foundation Day 2024 : ठाकरे की शिंदे, वर्धापन दिनाच्या सोहळ्यात कोण ठरलं वरचढ?

भाजपचे हिंदुत्व नकली असल्याची टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेला देशभक्तांची मतं मिळाली. नरेंद्र मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं. चंद्राबाबू, नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का..? जे मांझी म्हणाले राम खोटा आहे त्या मांझींच्या मांडीला मांडी लावून ते बसतात, असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर प्रहार केला.

फडणवीस, राज ठाकरेंची खिल्ली

महायुतीला बिनशर्थ पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंना ते उघडा पाठींबा म्हणजे बीन-शर्टवाले म्हणत खिल्ली उठवली तर, मी पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी म्हणत आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी चिमटा काढला.

 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Challenge to Modi : उद्धव ठाकरेंचं मोदींना 'Open Challenge' ; म्हणाले 'विधानसभेच्या तयारीला आताच लागा, फक्त...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com