Sanjay Raut, Kirit Somaiya, Sanjay Raut Latest Marathi News, Sanjay Raut News, Sanjay Raut allegation Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

सोमय्यांनी जास्त वचवच करु नये, आणखी प्रकरणे बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत गैरव्यवहार (INS Vikrant)प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनावर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

''आयएनएस विक्रांतचा गैरव्यवहार शंभर टक्के झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेला नाही, आरोपी भूमिगत झाले होते, फरार झाले होते. आरोपीला पोलिस ठाण्याला हजेरी लावावी लागणार आहे, त्यामुळे आरोपीने जास्त वचवच करु नये,'' असा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर (Kirit Somaiya)टीका केली आहे.

''किरीट सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत,'' असा इशारा राऊतांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत.

''न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे,'' असा प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना काल अटकपूर्व जामीन मिळाला. चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या जामीन मिळताच मुंबईत दाखल झाले. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाचे आभार मानले. कुठलाही गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप करुन तुम्ही माझे तोंड बंद करु शकत नाही, अशा इशारा राज्य सरकारला दिला. मी उद्धव ठाकरे सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच, असे आव्हानही त्यांनी दिले.

संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत बचावासाठी जमा केलेल्या पैशात सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT