शरद पवार आस्तिक की नास्तिक ; राज ठाकरेंना प्रत्युत्तर, व्हिडिओ व्हायरल

कन्हेरी जवळच काटेवाडी हे शरद पवारांचं गाव. पवारांचे ग्रामदैवत म्हणूनच या मंदिरांची ओळख आहे.
sharad pawar
sharad pawarsarkarnama

पुणे : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत,'' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत पवारांवर टीका केली. त्यामुळे शरद पवार (sharad pawar)हे आस्तिक आहेत की नास्तिक असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याचं उत्तर बारामतीकरांनी दिले आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना काल पवार म्हणाले की, "मी धर्माचे प्रदर्शन करीत नाही. मी आजवर १२ ते १४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. पण त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही.

sharad pawar
अजितदादांवरील आरोप पोरकट ; शरद पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली,'' असे पवार म्हणाले.

sharad pawar
sharad pawarsarkarnama

धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम प्रबोधनकारांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी राज ठाकरेंना लगावला.

sharad pawar
Video : राज ठाकरेचं वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका : शरद पवार

शरद पवार आस्तिक आहे की नास्तिक या प्रश्नाला उत्तर देताना बारामतीकरांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहेत. या व्हिडिओमध्ये बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातील मारुतीचे मंदीर दिसते आहे. पवार कुटुंबीयांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांनी साठ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

sharad pawar
राज साहेब, भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलताहेत याचं दुःख आहे!

कन्हेरी जवळच काटेवाडी हे शरद पवारांचं गाव. पवारांचे ग्रामदैवत म्हणूनच या मंदिरांची ओळख आहे. पवार कुटुंबीय हे मोठ्या श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. पवारांनी आतापर्यंत ज्या निवडणुका जिंकल्या त्या कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडल्यानेच, असे कन्हेरीचे ग्रामस्थ सांगतात.

गेली ६५ वर्षे पवार हे कन्हेरीच्या मारूतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील ज्या सदस्यांनी निवडणूक लढवली आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ या मंदिरातून झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे नास्तिक आहे, हे राज ठाकरे यांचे म्हणणे चुकीचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com