sanjay raut, Raj Thackeray sarkarnama
मुंबई

'मातोश्री'ला मशिद म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी सुनावलं

बाळासाहेबांची क्रेडीबिलिटी आहे म्हणून हा पक्ष पन्नास वर्षे टिकून आहे. मातोश्रीनं त्यांना मोठं केलं आहे, हे त्यांनी विसरु नये.

सरकारनामा ब्युरो

पुणे :मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज आपल्या भाषणात शिवसेनेला (shivsena) डिवचलं. त्याला शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. (Raj Thackeray latest news)

संजय राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी शिवसेनेवर बोलू नये, त्यांनी स्वत:च्या पक्षाबाबत बोलावं. मातोश्रीनं त्यांना मोठं केलं आहे, हे त्यांनी विसरु नये. त्यांनी आपला इतिहास तपासून पाहावा,"

"शिवसेनेची क्रेडीबिलिटी काय आहे हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. स्वतः पक्षाविषयी त्यांनी बोलावं. दुसऱ्याच्या पक्षाविषयी बोलू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्रात 50 वर्षांपासून काम करत आहे. बाळासाहेबांची क्रेडीबिलिटी आहे म्हणून हा पक्ष पन्नास वर्षे टिकून आहे," असे राज ठाकरे म्हणाले.

"औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर आतापर्यंत झाले असते. मात्र, शिवसेनेला राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करायचा आहे," अशी टिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "औरंगाबादचे नामांतर झालंच आहे, फक्त ते कागदोपत्री व्हायचं आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्रसरकारला राज ठाकरेंनी याबाबत सांगितलं पाहिजे,"

"एका खासदारांच्या विरोधामुळे राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला. त्यांना कोणी रोखलं होतं. भाजप पुरकृत त्यांचा दौरा होता. त्यांनी या विरोधाला ठोकरुन अयोद्धेला जायला पाहिजे होते," असा सल्ला राऊतांनी राज ठाकरेंना यावेळी दिला.

राज ठाकरेंच्या हिंदुत्वावरही राऊतांनी निशाणा साधला. ते म्हणाले,"शिवसेनेचं हिंदूत्व पन्नास वर्ष जुनं आहे. राज ठाकरे यांनी हिंदु्त्ववादीच्या शाल केव्हा पांघरली, हे सांगावं. ते कधीपासून हिंदुत्ववादी झाले ? आमचं हिंदूत्व तेजानं तळपत राहिल," "वैफतग्रस्त मनसेला उपचाराची गरज आहे," असा टोमणा त्यांनी लगावला.

"औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. कबर तोडण्याचे अधिकार केंद्राकडे आहे. कबर तोडण्यापासून राज ठाकरेंना कोणी रोखलं," असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

"या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे.त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

"राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार, मातोश्री काय मशिद आहे का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जेल झाली, मग मधू इथे आणि चंद्र तिथे. त्यानंतर लडाखमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य सोबत जेवताना दिसले. हे सर्व ढोंगी आहेत. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले. "लडाख येथे शासकीय दौऱ्यानिमित्त गेलो होतो, असे स्पष्टीकरण राऊतांनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT