धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

जप्त केलेले भोंग्यातून आता ऐकू येणार शाळांच्या प्रार्थना..
CM Yogi Adityanath
CM Yogi Adityanathsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन देशभरात राजकीय वातावरण तापलं असताना उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारने (CM Yogi Adityanath) या भोंग्यांबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

उत्तरप्रदेशात मंदिर आणि मशिदींवरील बेकायदा असलेले भोंगे योगी सरकारने जप्त केले आहेत. हे जप्त केलेले भोंगे आता शाळांना दान करण्यात येत आहेत. (Yogi Adityanath latest news)

याबाबतचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिला आहे. जप्त केलेले भोंगे काही जिल्ह्यातील शाळांना देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गोरखपूर आणि प्रयागराज येथील काही शाळांना हे भोंगे देण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात लखनौमधील शाळांना हे भोंगे दान करण्यात येणार आहेत.

CM Yogi Adityanath
कुणाच्याही नादाला लागा, पण पवारसाहेबांच्या नादाला लागू नका ; मुंडेंचा फडणवीसांना टोला

जप्त केलेले भोंग्यातून आता ऐकू येणार शाळांच्या प्रार्थना..

गोरखपूर येथे भाजपचे खासदार रवि किशन यांनी परिसरातील प्राथमिक शाळांना धार्मिक स्थळांवरील जप्त केलेले भोंगे शाळांना दिले आहेत. या भोंग्यातून आता प्रार्थना ऐकू येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या भोंग्यांचा वापर करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे जप्त करण्याची मोहिम सुरु केली आहे. मुख्यमंत्री योगींनी धार्मिक गुरुंना आवाहन केल्यानंतर त्यांनीही स्वेच्छेनं भोंगे उतरविलं आहेत. तसेच उत्तरप्रदेशात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाज कमी करण्यात आला आहे.

CM Yogi Adityanath
राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवारांकडून महत्वाची सूचना

आवाजाची मर्यादा

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून भोग्यांवर कारवाई केली जात आहे. विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. काही ठिकाणी परवानगी नसलेले भोंगे उतरवण्यात आली आहे. तर जिथे परवानगी घेतली आहे तिथे आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत योगी सरकारचे अभिनंदन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com