Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

वाजवत बसा घंटा ! शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी ; राऊतांचा हल्लाबोल

तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणावरून मुंबईत जोरदार राडा सुरु आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कालपासून राणांना रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य, त्यांना पाठबळ देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. राऊतांनी टि्वट करीत हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्दावर सध्या आक्रमक झालेल्या विरोधकांना टोला लगावला आहे. 'हिंदुत्व'यावर संजय राऊतांनी चोख शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''हिंदुत्व: काही जणांनी भाड्याने घंटा धारी हिंदुत्व स्वीकारले आहे..वाजवत बसा घंटा!! शिवसेनेचे हिंदुत्व गदा धारी आहे! लक्षात ठेवा!जय महाराष्ट्र!''

"तुम्ही कोणाच्या पाठबळाने मुंबईत येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक गप्प बसतील का, तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका, तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा तुम्हालाही घरे आहेत. पण आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.'

सरकार आमचे असल्याने आमचे हात बांधलेत, पण शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी आम्हाला देऊ नका. शिवसेनेला आव्हान देण्यासाठी, पुरुन उरण्यासाठी भाजपला सात जन्म घ्यावे लागतील, गेल्या दोन दिवसातल्या घटना पाहता अजून तर सुरुवातही झाली नाही. हा फक्त शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही तर जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. राणा यांना मोठं आम्ही करत नाही.

कालपर्यंत हिंदूत्वावर हल्ले करणारे हे बंटी आणि बबली आहेत. यांना भाजप किंवा आता नव हिंदूत्ववादी औवैसी आलेय, ते यांना मोठं करत आहेत. पण त्यांचेच हात जळणार आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याच वेळी त्यांनी 'Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी... जय महाराष्ट्र!!' असे ट्विट करत राणा दाम्पत्याला एक प्रकारे इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT