राणा यांचा राजकीय प्रवास भाडोत्रीटॅक्सी प्रमाणे ; नीलम गोऱ्हे यांचा टोला

नवनीत राणा या पुतणा मावशीचा वारसा चालवीत आहेत.
Neelam Gorhe, Navneet Rana
Neelam Gorhe, Navneet Ranasarkarnama
Published on
Updated on

पुणे : हनुमान चालिसावरुन राज्यात शिवसेना (shivsena) विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे.शिवसेनेनं कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा ठाम निर्धार खासदार नवनीत राणा (navneet rana ) व आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थान व मातोश्री परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (mp Navneet Rana Vs shivsena in Mumabai)

शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नवनीत राणा, रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवनीत राणा या पुतणा मावशीचा वासशा चालवीत आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी टीका केली आहे. गोऱ्हे यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Neelam Gorhe, Navneet Rana
उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी' ; शिवपाल-आझम खान एकत्र, सपात पडणार फूट ?

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ''हनुमान चालिशा म्हणणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. श्रीराम आणि हनुमान यांच्यावर श्रद्धा ठेवूनच शिवसेना काम करीत आहे. नवनीत राणा यांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून शिवसेनेनं हिंदुत्वासाठी सातत्याने आंदोलनं केली आहेत. नवनीत राणा या आता पुतणा मावशीचा वारसा चालवीत आहेत. हनुमान चालिसाचा उपयोग राणा या राजकीय आंदोलन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खंडीत करण्यासाठी करीत आहेत. कुठलाही शिष्टाचार न पाळता त्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत आहेत,''

Neelam Gorhe, Navneet Rana
मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका ; तीनशे बनावट कंपन्यांमध्ये गुंतवली अवैध रक्कम

''नवनीत राणा हे यांचा राजकीय प्रवास भाडोत्री टॅक्सी प्रमाणे आहे. त्यांनी अनेक पक्षाची दारे वाजवली आहेत.त्यांना कुठेच थारा मिळाला नाही, म्हणून आता भाजपचा अजेंडा चालवायला घेतला आहे. त्याला राजकीय स्वरुप देऊन त्या आकांततांडव करीत आहेत. खोट्या पद्धतीने प्रचार करण्याचे काम त्यांचे सुरु आहे,''असे गोऱ्हे म्हणाल्या. ''हनुमान चालीसा हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे, परंतु त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापरण्यास आमचा नेहमीच विरोध आहे,''असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसेनेनं आखली आहे. रात्रीपासूनच शिवसैनिक त्या परिसरात जमले आहेत. राणा दाम्पत्य व मातोश्री जवळ बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. खासदार नवनीत राणांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तर त्यांनी येऊनच दाखवावं, असं प्रतिआव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com