Akshay Shinde Encounter Sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter: एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला,आता जनता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर करेल!

Mangesh Mahale

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या 'एन्काऊंटर'वर संशय व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडले आहे.

अक्षय शिंदेचे 'एन्काऊंटर शंका घ्यावी असाच प्रकार आहे. चौकशीत अक्षयने अनेक गंभीर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नयेत म्हणून शिंदे-फडणवीस यांनी पुरावाच नष्ट केला, असा आरोप त्यांनी केला आहे. एका शिंदेचा एन्काऊंटर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या शिंदेंच्या (एकनाथ शिंदे) एन्काऊंटर जनता करेल, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

ही घटना घडली तेव्हा बदलापूरमधील जनता रस्त्यावर उतरली होती, आरोपीला आमच्या हातात द्या, ही मागणी जनता करीत होती. तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे करता येणार नाही म्हणून सांगितले. कारण ज्याचा एन्काऊंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे. एन्काऊंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

अक्षय शिंदे याच्या तोंडावर बुरखा होता, हातात बेड्या आहेत मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसे चालवतो, संडास साफ करणारा मुलगा गोळ्या कशा घालतो? कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झाले आहे. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले? असे अनेक प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.

"बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ही घटना झाली अशी चर्चा आहे. राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहेत. मला जेवढी अंडरवर्ल्ड माहिती आहे तेवढी माहिती गृहमंत्री फडणवीस आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही, " असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT