नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi)महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं. महाराष्ट्रातील भाजप (bjp)नेत्यांनी निषेध नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करायला हवी होती,'' असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ''आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
''कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल त्यांनी काढावं इथे. महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर? ज्या राज्यानं जगात सर्वोत्त काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रात फेकली नाही प्रेतं बेवारसपणे. किती खोटं बोलता आपण. एका तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यानं निषेध केला नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्र प्रेम, हा तुमचा महाराष्ट्र बाणा,'' अशा शब्दात राऊत यांनी भाजप नेत्यांना सुनावलं.ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत जाऊन बोलीन
"बोलण्याचा अधिकार दिला असेल एखाद्या सरकारनं तर या देशाचा नागरिक म्हणून, संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मलाही एक बाजू, सत्य हे लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे. मला जे काही बोलायचं होतं, ते मी बोललो. यापुढे जे काही बोलायचं आहे, ते मी महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबई शहरात जाऊन बोलीन." असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही
राऊत म्हणाले, ''दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांना देशाचा युगपुरुष मानला जातो. हे फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण बाणा आमच्याकडे आहे. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या, सरकार पडणार नाही. आणि जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा. शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही,''
खोटं बोलू नये
''किमान संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी तरी खोटं बोलू नये असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यानींही यावर चुप्पी साधणं हेच तुमचं महाराष्ट्र प्रेम आणि महाराष्ट्र बाणा आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ''छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आता शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणखी काही मोठे नेते असतील, हा महाराष्ट्राचा बाणा आहे, तो राहील,'' असे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.