लतादीदींच्या स्मारकानंतर आता अध्यासनाचा वाद ; कुटुंबीयांचे कुलगुरु पेडणेकरांना पत्र

मंगेशकर कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला.
lata mangeshkar
lata mangeshkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यात स्मारकावरून एकीकडे वाद पेटला असताना आता मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावरून नवा वाद समोर आला आहे.

खुद्द मंगेशकर कुटुंबीयांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर (suhash Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे.

लता मंगेशकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयावर मंगेशकर कुटुबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

lata mangeshkar
कोल्हापुरातील साड्या, बांगड्या, अन् ते चुरमुरे दीदी कधीच विसरल्या नाहीत!

सुहास पेडणकर यांनी घेतलेल्या परस्पर निर्णयावर मंगेशकर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत पत्र पाठवले आहे. मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता निर्णय घेऊ नये, असे पेडणेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राज्य सरकारने लता मंगेशकर हयात असताना त्यांच्या इच्छेनुसार मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ यांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसी नुसार मुंबई विद्यापीठातील जागा पाहणी करून निश्चित करण्यात आली होती.

lata mangeshkar
Lata Mangeshkar : तो स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही : मुख्यमंत्री

मात्र, मुंबई विद्यापीठाने समितीने सुचवलेली जागा लतादीदींच्या हयातीत उपलब्ध करून न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही, याचा खेद वाटत असल्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com