Sanjay Raut slams Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही राष्ट्रवादीबरोबर केली ती कुटनीती, आम्ही केलं ते काय होतं ? राऊतांचा फडणवीसांना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या या विधानांचा समाचार ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊतांनी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

भाजप आणि उद्धव ठाकरेंचं 2019 मध्ये पूर्ण बहुमत आलं. काही लोकं शपथा देखील खोट्या घ्यायला लागले आहेत. पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की, मनात त्यांनी माफी मागितली असेल. राजकारणाकरीता मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यासाठी त्यांनी माफी मागितली असेल. पण निश्चित देवी त्यांना माफ करेल, असे म्हणत काल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

"उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची हा खोटी शपथ घेतली, असे म्हणणे हा पोहरादेवीचा अपमान आहे. त्या समाजाच्या अनेक नेत्यांनी फोन करून सांगितले की देवेंद्र फडणवीस हे वारंवार आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवी हे जागृतदेवस्थान असल्याने तिची कोणीही खोटी शपथ घेत नाही. पण हे सगळे खोटारडे पोहरादेवीला खोटारडे पाडत आहेत," असे म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

चुकीची विधान करू नका, तुमचे हसू होते..

"देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो हा अधर्म आहे, हा अधर्म असला तरी कुटनीती आहे म्हणजेच राजकारण आहे. मग शिवसेना जेव्हा राष्ट्रवादीबरोबर गेली तेव्हा ते काय होतं? असा प्रश्न राऊतांनी फडणवीसांना केला आहे. "तुम्ही जाता ती कुटनीती, चाणक्यनीती, विदुरनीती मग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली ते काय होतं? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला हवे, वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये चुकीची विधान करू नका, तुमचे हसू होते," असे राऊत म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT