Supreme Court Assembly Speaker Notice : सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका ; सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यात उत्तर द्या !

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
 Supreme Court on Rahul Narevekar
Supreme Court on Rahul Narevekar Sarkarnama
Published on
Updated on

Disqualification of 16 mla supreme court hearing Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. "दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा," अशी सूचना न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहे. याबाबत न्यायालय त्यांना नोटीस पाठवणार आहे.

 Supreme Court on Rahul Narevekar
Ajit Pawar Mantralaya Meeting: अजित पवारांनी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावलं..; बैठकांचा सपाटा सुरु..

ही सुनावणी लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

 Supreme Court on Rahul Narevekar
OBC Reservation : पुन्हा 'तारीख पे तारीख' ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी ही सुनावणी होत आहे. या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनील प्रभु यांनी केली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com