Assembly Election Exit Polls  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : भाजपला Exit Poll मुळे फुटला घाम ! चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार येणार; राऊतांचा दावा

Exit Polls 2024 News: गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागत आहे

Mangesh Mahale

Lok Sabha Elections 2024 : मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (ता.3) लागणार आहे. काल (गुरुवारी) विविध प्रसारमाध्यमे, सर्वेक्षण कंपन्यांनी याबाबतचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सर्वेक्षणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राजस्थानसह चारही राज्यांत काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तर काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या भाजपला एक्झिट पोलमुळे घाम फुटला आहे, असे सांगत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "राजस्थानसह चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार बनेल, म्हणजेच इंडिया आघाडीचे सरकार बनेल. मिझोराममध्येसुद्धा प्रादेशिक पक्षासोबत काँग्रेस सत्तेत येईल. काँग्रेसचे चांगले दिवस आले आहेत. काँग्रेसचा विजय हा इंडिया आघाडीचा विजय आहे. इंडिया आघाडीतील कोणतेही पक्ष निवडणुकीत नसले तरी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने हे इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचे आहे."

"गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागत आहे. हे काँग्रेसमुक्त भारताचे लक्ष नसून यांच्यापासून (भाजपपासून) भारताला मुक्ती मिळणार त्याची ही हवा आहे. देशाच्या पंतप्रधानांना आठ आठ दिवस एका राज्यात राहावे लागत आहे," असा टोला राऊतांनी लगावला. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वेक्षण अहवालानुसार,

  • पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेसला आपली सत्ता स्थापन करता येणार आहे.

  • मिझोराम राज्यात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व असले तरी या राज्यातसुद्धा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षाची सत्ता येणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

  • राजस्थानात गेल्या 25 वर्षांची सत्ता बदलाची परंपरा कायम राहणार असून, यंदाच्या वर्षी भाजपचे कमळ फुलणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT