Madha Taluka : उपसरपंचपदाचं स्वप्न भंगले ; फोडाफोडीचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीतही...

Mungshi Gram Panchayat News : सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाले तेव्हापासून अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat Elections Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माढा तालुक्यातील आणि करमाळा विधानसभेला जोडलेली मुंगशी ग्रामपंचायत स्थापनेपासून (1956) सर्वाधिक वेळा काँग्रेस नेते धनाजीराव साठे यांची सत्ता आहे. एकूण सात ग्रामपंचायत सदस्यांची असलेली ही ग्रामपंचायत दिसायला छोटी असली तरी तालुक्याच्या राजकारणात चांगलीच गाजलेली असते.

करमाळा विधानसभेला जोडलेल्या 36 गावांपैकी एक मुंगशी ही ग्रामपंचायत विधानसभेलाही महत्त्वपूर्ण निर्णायक असते. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाले तेव्हापासून अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे या दोन बंधूंचा दादा मामा गट तर माजी आमदार धनाजीराव साठे यांचा एक गट सालाबादप्रमाणे आमने सामने असतात. दादा मामा विरुद्ध साठे गटात पारंपरिक लढत कायम पाहायला मिळाली. यंदाच्या 2023 च्या निवडणुकीत दादा मामा गटात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जशी राज्यात फूट पडली.

माढा तालुक्यातल्या मुंगशी ग्रामपंचायतमध्येदेखील निवडणुकीच्या तोंडावर दादा मामा गटामध्ये फूट पाहायला मिळाली. जगताप-महाडिक गट विद्यमान सरपंच किरण मोरे यांच्या एकतर्फी कारभारावर नाराज होऊन धनाजीराव साठे गटासोबत युती केली. दादा मामा गटातून फुटलेल्या जगताप - महाडिक गटाला पाच जागा, तर उपसरपंचपद असे ठरले होते, तर माजी आमदार धनाजीराव साठे गटाला दोन जागा, तर सरपंचपद असे रणनीतीमध्ये ठरले.

या निवडणुकीत दादा मामा गटाने स्वतंत्रपणे सातपैकी सात जागा लढवल्या. जगताप-महाडिक व साठे गटाच्या युतीने यंदाची निवडणूक सातपैकी सहा जागा व सरपंच पदासह मोठ्या फरकाने दादा मामा गटाचा पराभव केला. दादा मामा गटाला केवळ एकच जागा निवडून आणण्यात यश आले, तर दादा मामा गटाला विद्यमान सरपंच किरण मोरे यांचा मोठा पराभवदेखील सहन करावा लागला.

जगताप -महाडिक व साठे गट यांची सत्ता ग्रामपंचायतीवर निर्विवादपणे स्थापन होईल, असे वाटत होते. उपसरपंच निवडीमध्ये सोबत आलेल्या जगताप-महाडिक गटाला साठे गट सन्मानाने उपसरपंचपद देतील, असे वाटत होते.

पण उपसरपंच निवडीची पूर्व रात्र फोडाफोडीची व पळवापळवीची अन् विश्वासघाताची गेली. राज्यामध्ये जी फोडाफोडी सत्तांतरासाठी झाली तीच फोडाफोडी आणि पळवा पळवी माढा तालुक्यातील मुंगशी गावामध्ये उपसरपंच निवडीच्या बाबतीत झाली.

दादा मामा गटाचा झालेला मोठा पराभव यामुळे साठे गट हवेमध्ये गेल्याचा दिसत होता. आणि त्याच मग्रुरीमध्ये साठे गटाने जगताप- महाडिक गटापैकी निवडून आलेले चारपैकी दोन सदस्य रात्रीत फोडले. साठे गटांमध्ये रात्रीत पळवले. ठरल्याप्रमाणे महाडिक गटाला उपसरपंचपद देण्याचे स्वप्न रात्रीतच कोसळले होते.

साठे गटाने सरपंचपदाचा उमेदवार जगताप महाडिक गटाच्या मदतीने तर निवडून आणला होताच. परंतु उपसरपंचदेखील स्वतःकडे ठेवायचे होते ही कपटनीती महाडिक गटाला ओळखता आली नाही. फोडाफोडी आणि पळवा पळवीने साठे गटाने स्वतःच्या गटाचा उपसरपंच निवडून आणला.

आणि जगताप गटासोबत आलेल्या महाडिक गटाला उपसरपंच निवडीच्या निवडणुकीमध्ये कात्रजचा घाट दाखवला. यामुळे दादा मामा गटामध्ये पडलेली फूट याचा फायदा हा माजी आमदार बाजीराव साठे गटाने थेट सरपंच आणि उपसरपंच निवडीत घेत या दोन्ही पदांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

मुंगशी ग्रामपंचायतच्या विरोधी बाकांवर दादा मामा गटाचे भागाबाई शंकर लोंढे , सुमन बबन भोई, तर साठे गटाला मिळालेले स्वप्नाली महाडिक फिरून पुन्हा दादा मामा गटांमध्ये परतल्या. तिघांनी विरोधी बाकांवर बसण्याचे मान्य केले, तर साठे गटाकडून सरपंच कमल सूर्यकांत महाडिक, उपसरपंच शंकर काळे ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब पाटील, रेश्मा जगताप व भीमा गावले हे सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले.\

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Elections
Hasan Mushrif : कारखान्यात दडलंय काय? कर्जामुळे झोप न लागणाऱ्या मंत्र्याच्या पायाला भिंगरी

सत्तेची लालसा भोवली...

यातून जनतेला एकच बोध मिळाला की राज्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी पळवा पळवी आणि फोडाफोडी होत असेल तर गावच्या निवडणुकीमध्ये उपसरपंच पदाच्या खुर्चीसाठीसुद्धा फोडाफोडी आणि पळवा पळवी होताना पाहिले गेले.

दादा मामा गटाचे सरपंच असलेले किरण मोरे यांचा एकतर्फी कारभार आणि फुटीर होऊन गेलेले महाडिक व जगताप गट या दादा मामांच्या विश्वासू सहकाऱ्यांना सत्तेची लालसा भोवली. सत्तेच्या मग्रुरीत असलेल्या साठे गटाने फुटीर होऊन आलेल्या महाडिक- जगताप गटाला कात्रजचा घाट दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राज्यातील फोडाफोडीचा आणि पळवा पळवीचा मार्ग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

Gram Panchayat Elections
Solapur News : सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना तंबी; हलगर्जीपणा करू नका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com