मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत गैरव्यवहार (INS Vikrant) प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनावर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी निशाणा साधला आहे.
'मोठ्या-मोठ्याने टीव्हीसमोर येऊन बोलल्यामुळे तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर येणार आहेत भविष्यात. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे,'' अशा शब्दात राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
''आयएनएस विक्रांतचा गैरव्यवहार शंभर टक्के झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेला नाही, आरोपी भूमिगत झाले होते, फरार झाले होते. आरोपीला पोलिस ठाण्याला हजेरी लावावी लागणार आहे, त्यामुळे आरोपीने जास्त वचवच करु नये,'' असा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर (Kirit Somaiya)टीका केली आहे.
'किरीट सोमय्यांना जामीन मिळाला आहे पण तो अंतरिम जामीन आहे. कोर्टाने त्यांना पोलीस स्टेशनात हजर राहण्यास सांगितलं आहे. जशी एका गुन्हेगाराला लावायला सांगितली जाते. तुम्ही निर्दोष नाही आहात. तुमची चौकशी सुरु राहिल. 'तुमच्यावर आरोपपत्र आहे, तुम्ही पैशाचा अपहार केलेला आहे, आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत,'' असा टोमणा राऊतांनी सोमय्यांना लगावला.
''न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे,'' असा प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांना काल अटकपूर्व जामीन मिळाला. चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या जामीन मिळताच मुंबईत दाखल झाले. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाचे आभार मानले. कुठलाही गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप करुन तुम्ही माझे तोंड बंद करु शकत नाही, अशा इशारा राज्य सरकारला दिला. मी उद्धव ठाकरे सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच, असे आव्हानही त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.