NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-Congress Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीची गोव्यातही हवा; राजकीय हालचालींना वेग

सरकारनामा ब्युरो

पणजी : भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करता देशातील राजकारणाला (Politics) नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) या पॅटर्नचं भाजपविरोधी अनेक पक्षांनी स्वागत केलं. आताच हा पॅटर्न गोव्यातही (Goa) राबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत.

गोव्यामध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. 2017 मध्ये काँग्रेसच्या (Congress) हातातोंडाशी आलेला घास भाजपने हिरावून घेतला. त्यानंतर काँग्रेसची वाताहात झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी (Election) काँग्रेसकडून भाजपविरोधी पक्षांना चुचकारले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांचा समावेश आहे.

याबाबतची बोलणीही सुरू झाल्याची माहिती राऊत यांनी सोमवारी रात्री दिली. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ते म्हणाले, गोव्यामध्ये आज काँग्रेसच्या नेत्यांशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर या बैठकीला उपस्थित होते. तसेच माझे सहकारी जीवन कामत आणि जितेश कामतही सहभागी झाले होते. महाराष्ट्रासारखा महाविकास आघाडीची शक्यता नाकारता येत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

राऊत हे सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच महाविकास आघाडीबाबत निर्णय़ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपला रोखण्यासाठी तीनही पक्ष एकत्र आल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं तर्क लावले जात आहेत. शिवसेनेकडून सात जागांची मागणी काँग्रेसकडे करण्यात आल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येही शिवसेनेकडून चर्चा घडवून आणली जाऊ शकते, अशीही शक्यता आहे.

गोव्यात सोमवारी दाखल झाल्यानंतर राऊत म्हणाले होते की, गोव्यामध्ये शिवसेना काही जागांवर नक्कीच लढेल. उद्या आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रात हे सूत्र यशस्वी झाले आहे. गोव्यामध्येही त्याचा विचार केला जाईल. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरवले जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT