नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) काँग्रेसमधील वाद अजूनही कमी झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) हे मुख्यमंत्री पदासाठी प्रय़त्न करत असल्याची चर्चा होती. पण आता सिध्दू आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांच्यातील वादही आता समोर आला आहे. आपण गृहमंत्री झाल्यापासूनच ते नाराज असल्याचे रंधावा यांनी म्हटले आहे.
सुखजिंदर सिंग रंधावा यांचे नाव सुरूवातीला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण ऐनवेळी चरणजितसिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. सिध्दू यांच्याकडून माजी मुख्यमंत्री अमरिंदरिंग यांच्याविरोधात मोहिम उघडण्यात आली होती. त्यात त्यांना यशही मिळाले पण मंत्रिमंडळात स्थान मिळवता आले नाही. तेव्हापासून सिध्दू हे आपल्यास सरकारवर अनेकदा नाराजी व्यक्त करतात.
आता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री रंधावा व सिध्दू यांच्यातील वाद समोर आला आहे. माध्यामांशी बोलताना रंधावा म्हणाले, नवज्योतिसिंग सिध्दू हे मी गृह मंत्री झाल्यापासूनच नाराज आहे. सिध्दू यांना गृह मंत्रिपद हवं असले तर मी एका मिनिटांत या पदाचा राजीनामा देईन, असं रंधावा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर सतत वाद बाहेर येत असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, सिध्दू यांना निवडणूक (Election) प्रचारादरम्यान आपणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. पण आता त्यांना पक्षाने जोरदार झटका दिला आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या राजीनाम्यामागे सिध्दू यांची भूमिका महत्वाची ठरल्याचे मानले जाते. तसेच ते विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर अनेकदा निशाणा साधतात. पण आता पक्षानेच सिध्दू यांना झटका दिला आहे.
आगामी निवडणुकीसाठी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा कोण, हे आधीच जाहीर केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सुनिल जाखड यांनीच ही माहिती दिली. पक्ष आगामी निवडणूक संयुक्त नेतृत्वाच्या माध्यमातून लढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील जातीय समीकरणं आणि पक्षातील कलह थांबवणे, हा त्यामागचा उद्देश आहे. कारण पंजाबमधील बडे नेते हे विविध समाजातील आहेत, असे जाखड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.