Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मोठी बातमी : 'मविआ' मध्ये फूट पडणार ;राऊतांनी स्पष्टच सांगितलं..

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच पेटलं आहे. भाजप, शिंदे गट, मनसेने राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल (गुरुवारी) राहुल गांधी याच्या या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (Sanjay Raut news update)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राहुल गांधी यांच्या सावरकर या मुद्यावरुन महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असे स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राऊत पत्रकारांशी बोलत होते. सावरकरांना भारतरत्न द्या, असे राऊत म्हणाले.

"शिवसेनेने सावरकरांच्या हिंदुत्वाचा कायमच पुरस्कार केला आहे. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना जुने वाद उकरुन काढले जात आहेत, भाजपने राजकारणासाठी हा मुद्या उचलला आहे, "असे राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानामुळे सावरकरांचा वाद महाविकास आघाडीच्या मुळावर येणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

राऊत म्हणाले, "भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा विषय काढायला नको होता, यामुळे शिवसेनेला नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रामध्ये देशाच्या मोठ्या वर्गाला सावरकरांबद्दल आदर आहे,"

अकोला येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधकांकडूनही त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांची आज मोठी सभा शेगाव येथे होत आहे. अकोला येथील कुपट बाळापूर येथील बाळापूर येथून पदयात्रा सुरु झाली आहे.

ही यात्रा आज बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात प्रवेश करत आहे. दुपारी चार वाजता राहुल गांधी शेगाव येथील गजानन महाराज यांचे दर्शन घेतील. त्यानंतर याच ठिकाणी म्हणजेच शेगाव येथील सभेत राहुल गांधी भाषण करतील. आजच्या सभेत राहुल गांधी काय भाषण करतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेदेखील आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

आज राहुल गांधी यांची सभा

भारत जोडो यात्रे दरम्यान आज (शुक्रवारी) शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होत आहे, या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलने 'खळखट्याक'होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसैनिकांनीही आज मोठ्या संख्येने शेगावात दाखल होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. "शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा," असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT