Sanjay Raut Latest News, Devendra Fadnavis Marathi News Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut :फडणवीसांना नेमकी कशाची भीती वाटते ? ; एवढा कांगावा कशासाठी करताहेत ?

MP Sanjay Raut on Bjp Devendra Fadnavis : अडीच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस अतिशय नैराश्यात गेले होते.

सरकारनामा ब्युरो

MP Sanjay Raut on Bjp Devendra Fadnavis :“मला जेलमध्ये टाकण्यासाठी संपूर्ण आघाडी सरकार कामाला लावलं होतं. मला अटक करण्यासाठी काहींवर जबाबदारी टाकण्यात आली होती.” असा गौप्यस्फोट भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत.

फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले आहे. “वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्यांना कशाची भीती?” असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे. फडणवीस यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'मविआ सरकार मला अटक करणार होते,' असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस सातत्याने करत आहे. मविआ सरकारच्या काळात पोलिस केवळ जबाब नोंदवण्यासाठी फडणवीसांच्या घरी गेले होते. फोन टॅपिंगप्रकरणी पोलिस तपास करत होते. त्याचा एवढा कांगावा देवेंद्र फडणवीस का करत आहेत?, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय.

"आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस अतिशय नैराश्यात गेले होते. कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे तेव्हा आपल्याला अटक करावी, असे देवेंद्र फडणवीसांनाच वाटत असावे. जेणेकरुन आपण चर्चेत येऊ, असे त्यांना वाटत असावे. म्हणूनच ते अटकेची कॅसेट वारंवार वाजवत आहेत,"असा टोला त्यांनी लगावला.

“देवेंद्र फडणवीस यांचे काही भाषण पाहिले असता ते म्हणत होते की आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे माणसं आहोत. मग असा माणूस का घाबरत आहे? फडणवीसांना नेमकी कशाची भीती वाटते? विरोधी पक्षनेत्याला कोणी अटक केली असती? भाजपातल्या चोर लफंग्यांना तुम्ही क्लिन चीट देता,"असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले..

  1. बॅंकांना लुटणाऱ्यांना क्लिन चीट देता. आमचे फोन टॅप करणारे यांच्यावरील गुन्हे तुम्ही मागे घेता. मग स्वतःवर जेव्हा चौकशीची वेळ आली तेव्हा मला अटक करणार असा कांगावा करता?

  2. साधं पोलीस चौकशीसाठी तेही तुमच्या घरी आले होते. आमच्यासारखं निदान घरी येऊन धाडी तर नाही घातल्या. राजकारणात पैशांचा बेफाम वापर होतोय. ग्रामपंचायतीपासून प्रत्येक टप्प्यावर रेट कार्ड आहे, गावोगावी कमिशन एजंट नेमले असून माणसं विकत घेताना दिसत आहेत.

  3. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीची परीक्षा आहे आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारच विजयी होईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT