Shashikant Warishe Murder Case sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : देवेंद्रजी, राज्यात काय सुरु आहे..; राऊतांचा फडणवीसांना सवाल

Shashikant Warishe Murder Case : वारीसे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अशी मागणी राऊतांनी फडणवीसांना पत्रातून केली.

सरकारनामा ब्युरो

Shashikant Warishe Murder Case : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारसे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध करण्यात येत आहे. सोमवारी (६ फेब्रुवारी) मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीसे (Shashikant Warishe) यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी (७ फेब्रुवारी) पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी ठाण्यातील पत्रकार आक्रमक झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहे. ठिकठिकाणी पत्रकारांनी निदर्शने केली आहेत.

वासीसे यांच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. वासीसे यांचा अपघात नसून घात आहे, त्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची गांभीर्यीने चौकशी करावी, वारीसे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अशी मागणी राऊतांनी फडणवीसांना पत्रातून केली. "देवेंद्रजी, राज्यात कायदा सुव्यवस्थेचे सुरु आहे, " असा रोखठोक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

"शशिकांत यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली. तो कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे, असे पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

आज (शनिवारी) ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत हे वारीसे यांच्या कुटुंबियांच्या भेट घेणार आहेत. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा आज रत्नागिरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आहे. या मोर्चात विनायक राऊत सहभागी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT