Sanjay Raut | CM Eknath Shinde
Sanjay Raut | CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay raut : कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी ; राऊतांचा घणाघात

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Karnataka border dispute : जत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुंबची योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. तुंबची योजना तातडीने सुरू करत ते यतनाळ येथील ओडापात्रातून सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कर्नाटकने सोडलेल्या हे पाण्यामुळे राजकारण तापलं आहे. यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले, " कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसमाधी घेतली पाहिजे," तरुंगातून बाहेर आल्यानतर राऊत यांचा आज नाशिक येथे पहिला दौरा आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, "पालापाचोळा गेल्याने काहीच फरक पडत नाही. एखादा आमदार सोडून गेल्याने काहीच फरक पडत नाही. कधीही निवडणुका घ्या, विजय शिवसेनेचाचच होईल. शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी निवडून दाखवावं. आता त्यांना भविष्य नाही. ४० आमदार गेले तरीही पक्ष तिथेचं आहे.

'त्या'गटात सध्या काय सुरु आहे, याची खबरबात माझ्याकडे आहे.त्यांच्यामध्ये अंतर्गत ठिणग्या उडत आहेत. स्फोट होईल तेव्हा वस्तुस्थिती समोर येईल. शिवसेना हाच खरा चेहरा आहे. गट निर्माण करुन कोणी निवडून येत नाही. महाराष्ट्र आमच्या पाठिंशी आहे",असे राऊत म्हणाले.

"कॉंग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला अपमान भाजपला दिसतो, पण शिंदे-फडणवीस यांनी शिवरायांचा झालेला अपमान दिसत नाही. शिवरायांचा अपमान होतो, ही कसली क्रांती," असा रोखठोक सवाल राऊतानी राज्य सरकारला केला आहे. 'शिवाजी महाराज यांचा अपमान केलेल्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही,' असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT