NCP Pune : कोश्यारी 'गो बॅक' साठी राष्ट्रवादीची रणनीती, प्रशांत जगतापांची पोलिसांना हूल

NCP Pune : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Prashant Jagtap, Bhagat Singh Koshyari
Prashant Jagtap, Bhagat Singh Koshyari sarkarnama
Published on
Updated on

NCP Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज (शुक्रवारी) पुण्यात दाखल होत आहेत. ते राजभवनात येणार आहेत, त्यानंतर यशदा येथे राज्यपालांचा नियोजित कार्यक्रम आहे. शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना शिवरायांच्या जन्मभूमी-कर्मभूमीमध्ये राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राज्यपालांना निषेध करण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे, जगताप यांनी आंदोलन करु नये, आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जगताप हे जबाबदार राहतील,असे पोलिसांनी नोटीशीमध्ये म्हटलं आहे.

आज सकाळी जगताप यांना ताब्यात घेण्यासाठी वानवडी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. पण जगताप यांना या नोटीशीची त्यापूर्वीच कुणकुण लागल्याने ते घर सोडून अज्ञानस्थळी रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. यात त्यांनी राजपालांना इशारा दिला आहे.

Prashant Jagtap, Bhagat Singh Koshyari
AAP : आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आपच्या उमेदवाराला सहा महिन्याची शिक्षा

जगताप म्हणाले, "राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. "गनिमी कावा करुन आम्ही राजभवनावर पोहचणार आहोत. आज दिवसभरात राज्यपालांना 'गो बॅक'च्या घोषणा ऐकाव्या लागतील, त्यांना निषेधाचे झेंडे पाहावे लागतील. राज्यपाल मुर्दाबादच्या घोषणाही त्यांना ऐकाव्या लागतील," असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांना होणारा विरोध लक्षात घेता राजभवन आणि यशदा येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस जगताप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com