Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit Somaiya  sarkarnama
मुंबई

देशद्रोहींवर दगड पडतातच ; गुन्हेगारांबाबत भाजपला मळमळ का ? राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल रात्री खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे राणांना भेटण्यासाठी आले होते, त्यानंतर गोंधळ झाला,सोमय्यांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करीत टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी पत्रकार परिषदेत सोमय्यांवर विविध आरोप करीत आज हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, ''काल एक खोटारटा माणूस दुसऱ्या आरोपीला भेटायला गेला होता. सोमय्या हे आयएनएस विक्रांत प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांच्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले असतील तर शिवसेना त्याचे समर्थन करते,'' ''आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही,शिवसेना महत्वाची आहे,'' असे राऊतांनी सुनावले.

'देशद्रोही आणि गुन्हेगारांवर एखाद दुसरा दगड पडतोच,''असे सोमय्यांचे नाव न घेता राऊत म्हणाले, ''देशद्रोही, गुन्हेगारांना लोक माफ करणार नाही. पोलिस कुणावरही विनाकारण कारवाई करीत नाहीत. सरकार राजकीय सुडाने कारवाई करीत नाही. शिवेसेनेच्या विरोधात बोलणाऱ्याना केंद्र सरकार सुरक्षा देते. त्यामुळे या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही. भाजप नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समोर येऊन लढावे,'' ''गुन्हेगारांबाबत भाजपला मळमळ का?''असे राऊत म्हणाले.

''जर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्ष नेत्यांना काही प्रश्न असतील तर आधी मुख्यमंत्र्यांना भेटा.नंतर तुम्हाला काय केंद्रात भेटायचं असेल, युनोत जायचं असेल तिकडे जा, असं राऊत म्हणाले. ''वैफल्यग्रस्त माणूस फडणविसांसारखी वक्तव्य करतो. फडणवीस अजून २५ वर्ष वैफल्यग्रस्त असतील,'' असंही राऊत म्हणाले.

''तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला विचारतो का? मग पोलिसही जर कारवाई करत असतील तर काही असेल तरच कारवाई होईलच. काहीतरी असल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाही,'' असे राऊत यांनी स्पष्ट केलं. सोमय्यांचे आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊतांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT