Ram Nath Kovind praised Tipu Sultan Sarkarnama
मुंबई

'राष्ट्रपतींकडूनही टिपू सुलतानचं कौतुक; भाजप त्यांचाही राजीनामा मागणार का?'

शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मालाड (Malad) मालवणी येथील मैदानाच्या टिपू सुलतान (Tipu Sultan) नामकरणावरून भाजप आक्रमक झाले आहे. काँग्रेसचे (Congress) स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या आमदार निधीतून या मैदानाचे काम करण्यात आले आहे. त्याला भाजपसह बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेनेही (Vishwa Hindu Parishad) विरोध केला आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Ram Nath Kovind praised Tipu Sultan)

संजय राऊत यांनी गुरूवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. ते म्हणाले, फक्त त्यांनाच इतिहासाचं ज्ञान असल्याचे भाजपला वाटते. त्यांच्यातील प्रत्येक जण नव्याने इतिहास लिहिण्यासाठी बसले आहे. हे इतिहासकार इतिहास बदलण्यासाठी इथे आहेत. आम्हाला टिपू सुलतानविषयी माहिती आहे, भाजपने शिकवू नये. हे त्यांना शोभत नाही. सरकार निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे.

तुम्ही नव्याने इतिहास लिहू नका. तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. टिपू सुलतान हा ऐतिहासिक योध्दा होता, स्वातंत्र्यसैनिक होता, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकमध्ये जाऊन कौतुक केलं आहे. आता तुम्ही राष्ट्रपतींनाही राजीनामा मागणार का? भाजपने यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. ही केवळ नौटंकी आहे, असा हल्लाबोल करत राऊतांनी भाजपला सवाल केला.

दरम्यान, मैदानाबाहेर भाजपने बुधवारी जोरदार आंदोलन केले. गेल्या ७० वर्षांत टिपू सुलतानच्या नावावरून कोणताही संघर्ष झाला नाही, आज भाजपने देशाची बदनामी करण्यासाठी आपले गुंड पाठवले आहेत आणि प्रकल्पांच्या नावावरून गदारोळ करून देशाचा विकास होऊ दिला नाही. आम्हाला नामांकनावरून वादात पडण्याची गरज नाही, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

टिपू सुलतान या नावावर ठाम असून त्यांनी टिपू सुलतानच्या नावाला आपले समर्थन आहे. भाजपने या मैदानाला जे नाव दिलं आहे, ते विसरुन आम्ही इथे जे विकासकाम केलं आहे, त्याकडे लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी आपण केलेल्या कामाकडेही लक्ष वेधल आहे. त्याचबरोबर यावेळी विरोधकांचा विरोध झुगारुन मैदानाचा नामकरण सोहळा करण्यात आले. क्रिकेट सामना विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT