विशाल फटेची ही ऑफर पाहिली का? बक्कळ कमाईचे हे गणित भल्याभल्यांनाही सुटलं नाही...

विशाल फटे याच्याविरूध्द आतापर्यंत 99 तक्रारदारांनी तक्रारी दिल्या आहेत.
Vishal Phate Scam News
Vishal Phate Scam News Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याने अनेक प्रलोभनं दाखवत गुंतवणुकदारांना आकर्षित केल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याचे सांगत तो लोकांना मोठा परतावा देण्याची अमिष दाखवत होता. पण पोलीस तपासांत त्याने बाजारात पैसे गुंतवलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तसेच त्याने गुंतवणुकदारांसाठी अनेक आकर्षक स्कीम तयार केल्या होत्या. त्याचं गणित भल्याभल्यानांही जमणार नाही, अशा या स्कीम होत्या.(Vishal Phate was trying to attract investors by creating an attractive scheme)

फटे याने काही दिवसांपूर्वीच एक स्कीम आणली होती. एक जानेवारी 2022 पासून ही स्कीम सुरू होणार होती. त्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना सहभागी होता येणार होती. फटकडे नव्याने पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणुकदारांनाच या स्कीमध्ये पैसे गुंतवता येणार होते. स्कीमनुसार एक जानेवारी रोजी 10 लाख रुपये गुंतवायचे होते. पुढील वर्षभर कोणताही परतावा न घेतल्यास गुंतवणुकदारांना 2023 मध्ये तब्बल सहा कोटी रुपये मिळणार होते. (Vishal Phate Scam News)

Vishal Phate Scam News
बार्शी स्कॅमबद्दल विशाल फटेकडून धक्कादायक माहिती: पोलिसही चक्रावले

फटे या स्कीममध्ये किती लोकांनी पैसे गुंतवले, किती गुंतवले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, अशाच स्कीमचे प्रलोभनं दाखवून तो पैसे गुंतवत असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, आतापर्यंत त्याने कसे पैसे गोळा केले, ते कुठे गुंतवले, त्यात कोण सहभागी होते याची माहिती पोलिस घेत होते, त्यामध्ये फटेने शेअर मार्केटमध्ये (Share Market) कोणतीही गुंतवणूक केले नसल्याचे समोर आले आहे. (Vishal Phate Update)

असा देत होता परतावा?

आतापर्यंत 99 तक्रारदारांनी फटेविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्या तक्रारींची शहानिशा पोलिसांना करायची आहे. त्यामुळेच आता आलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तपासत पोलिसांना माहिती मिळाली की, फटे एकाकडून पैसे घेऊन तो दुसऱ्यांना द्यायचा. गुंतवणूकदारांनी दिलेली रक्कम वरचेवर फिरवत होता. लोकांना परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने अनेक जणांना त्याने दुसऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दिले. मात्र, यामुळे लोकांचे देणे वाढले. ही गोष्ट लक्षात आल्याने फटे पसार झाला होता.

Vishal Phate Scam News
फटेकडून फसवणुकीची सुरुवात बारावीपासूनच... आई म्हणून 'मेस'मधील महिलेला केले उभे!

चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

फटेला न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फटेला आधी न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस (Police) कोठडी दिली होती. 8 दिवसांच्या पोलिस कोठडीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. फटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलीसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलिस कोठडीत असल्यानंतरच आरोपीची चौकशी करता येते. त्याला न्यायालयीन कोठडीत म्हणजे कारागृहात पाठविण्याची विनंती पोलिसांनीच केली होती.

विशाल फटे याने बार्शीसह (Barshi) राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. फटे विरोधातील तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 99 जणांनी तक्रार दिलेली आहे. यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढून 20 कोटी रुपयांवर पोचला आहे. फटेने फसवणूक केल्याप्रकरणी पुढे आलेले बहुतांश गुंतवणूकदार हे बार्शीतील आहेत. तसेच, उस्मानाबाद आणि पुण्यातील काही जणांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखा या तक्रारदारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन फसवणुकीची आकडा निश्चित करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com