Maharashtra Politics  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: बारामतीची कुस्ती शरद पवारच मारणार; अजितदादांना माती चारणार; राऊतांचा दावा

Mangesh Mahale

Mumbai: अजित पवार काही दिवसापासून सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या गाठीभेटी वाढत असल्याने अजितदादांच्या मनात नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न राजकीय मंडळींना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा वाद न्यायालयात सूरु आहे. यावर खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता '2024 मध्ये शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना माती चारणार,' असा दावा त्यांनी केला आहे.

"काही कौटुंबिक आणि संस्थात्मक गोष्टी असतात. अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे बारामती मैदान एकच आहे. बारामतीची कुस्ती हे शरद पवार मारतील आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच नेतृत्व करतील” असे राऊत म्हणाले.

शरद पवार पुन्हा एका संकटातून उभे राहत आहेत

"महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोन नेते राहतील, जसे त्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, आजही शरद पवार आपल्यासोबत आहेत. त्यावेळी दोनच नेत्यांचे राजकारण होते. आज शरद पवार पुन्हा एका संकटातून उभे राहत आहेत. आणि ते परत नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांचे राजकारण यापुढे महाराष्ट्रात यशस्वी झालेले दिसेल," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

राज्यात आणि दिल्लीत सत्तेत येणार..

राऊत म्हणाले, “मी शरद पवारांना ओळखतो, अजित पवार आणि शरद पवार हे तुम्ही किती एकत्र दिसले तरी देखील 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नितृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 2024 साली राज्यात आणि दिल्लीत सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिशेने राज्याची आणि देशाची हवा मला वाहताना दिसत आहे.”

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राऊतांवर खास शैलीत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याबाबत राऊत म्हणाले,"“मी सुषमा अंधारे यांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्या आमच्या भगिनी आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT