Sanjay Raut Threat Case  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Threat Case : मोठी बातमी ; राऊत धमकी प्रकरण बनाव ? आरोपी मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय..

Sanjay Raut news : संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत राऊत धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांना आवाहन केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणाची तपास सुरु आहे. यात मोठी अपडेट समोर येत आहे. सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचे समजते. याप्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याची प्राथमिक माहिती आहे.

राऊत बंधुंना धमकी दिल्यानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले, यात मयूर शिंदे यांचे नाव समोर आले आहे. राऊर धमकी बनाव प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत राऊत धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांना आवाहन केलं आहे.

"संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्ती ला अटक केली आहे का ? आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे.मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं," असे संदीप देशपांडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांना गेल्या गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी आली. सुनील राऊत यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत असल्याचं सांगण्यात आले. या धमकीनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज्य सरकारवरच गंभीर आरोप केले होते. "मला (संजय राऊत यांना) आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे",अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली होती.

राऊत म्हणाले, "मला आलेली धमकी ही सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ठाण्यातील एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची माझ्यावर हल्याची योजना आहे", असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मयूर शिंदे हा सुनिल राऊत यांचा निकटवर्तीय आहे की नाही, याबाबत संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, याकडे माध्यमांचे लक्ष आहे.

संजय राऊत आणि सुनील राऊतांना आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. राज्यातील कोणत्याही पक्षाचा नेता असुरक्षित असणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT