Ashish Shelar News : मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ जाहिरातीवरून शेलारांचे कानावर हात !

Ashish Shelar News : सत्तेत असो वा नसो आम्ही हे काम करणारच...
Ashish Shelar News
Ashish Shelar News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून देशात नरेंद्र व राज्यात एकनाथ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून नाराजी व्यक्त होत असताना यावर मात्र भाजपचे नेते आशिष शेलार यांनी बोलण्यास नकार दिला. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात अर्थ नाही. नाशिक महापालिकेत महिन्याभरापासून आयुक्त नाही, हा गंभीर विषय आहे," असे शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

Ashish Shelar News
Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं ; एकमेव महिला मंत्र्याच्या घराला आग..

"राज्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या जातीय दंगलीमागे कटकारस्थान असल्याचा संशय असून, चौकशीतून सत्य बाहेर येईल," असा दावा आशिष शेलार यांनी केला. "हिंदू जागरण हे आमच्या पक्षाचे काम आहे. सत्तेत असो वा नसो आम्ही हे काम करणारच," असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्यकाळातील माहिती देण्यासाठी भाजपतर्फे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार आशिष शेलार बोलत होते. ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांत राज्यात दंगली घडत आहेत. त्यामागे कटकारस्थान असल्याचा संशय आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी देखील संशय व्यक्त केला आहे,"

"याबाबत चौकशीतून सत्य बाहेर येईलच. राज्यात ठिकठिकाणी हिंदू जनजागरण मोर्चे काढले जात आहेत. त्याचे समर्थन करताना भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले. हिंदूंचा जनजागरण करणे हे आमचे काम आहे. सत्तेत असो वा नसो आम्ही ते करणारच," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ashish Shelar News
Lok Sabha Elections News : या मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक ; दोनवेळा राज्यसभेवर..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेल्या शुभेच्छा राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहेत. त्यावर शेलार यांनी वाढदिवसानिमित्त फक्त शुभेच्छा दिल्याचे सांगितले. भाजपतर्फे मोदी सरकारची विकासकामे लोकांपर्यंत पोचण्यासाठी अभियान सुरू आहे. ते देशातील सर्वांत मोठे अभियान आहे. लोकांना हिशोब द्यायचे हे काम आहे. काँग्रेसकडून कधीच स्पष्टपणे केलेल्या कामांचा जबाब दिला गेला नाही.

लोकांचा प्रतिसाद कसा आहे, यासाठी महाजनसंपर्क अभियान राबवीत आहोत. त्याला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही व त्यांना आता गांभीर्याने देखील घेत नाही, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील का, यावर थेट बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com