Dr. Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde News : मोठी बातमी : जाहिरातीवरुन राजकारण तापलं; खासदार शिंदे दिल्लीला रवाना : मोठ्या घडामोडीची शक्यता?

Shivsena News : शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shrikant Shinde News : शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीकांत शिंदे यांचे दिल्लीला जाण्याच्या टायमिंगवरुन राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

शिवसेनेने मंगळवारी राज्यातील सर्व वृत्त पत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीवरुन भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे एका सर्व्हेच्या हवाल्याने दाखवण्यात आले आहे.

राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे, असे या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीमुळे भाजप (BJP) नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, फडणवीसांनी तो दौरा अचाणक रद्द केला. त्यामुळे या राज्यात जोरदार चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात असे सांगितले जात आहे.

श्रीकांत शिंदे हे मुंबईहून सायंकाळी साडेसहा वाजता दिल्लीला रवाना झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला जात असून कोणत्याही नेत्यांना भेटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, भाजपचे (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे, आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती.

त्यामध्ये जर समजा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. यामध्ये कुणाचा काही उद्देश आहे का? त्यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे का, असे सवला दरेकर यांनी उपस्थित केले. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्य नाही. युतीचे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT