Dr. Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंनी हलके केले शिवसेनेच्या खासदारांचे टेन्शन; केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाचा दिला दाखला

Shivsena News : कुणी बॅनर लावले म्हणून खासदार होत नाही.

शर्मिला वाळुंज

kalyan-dombivli News : ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त "भावी खासदार'' असा उल्लेख असणारे बॅनर कल्याण लोकसभा मतदारसंघात झळकले होते. यावर बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इच्छा कोणीही प्रकट करू शकते. बॅनर लागले म्हणजे खासदार होत नाही. भावी मुख्यमंत्री असेही बॅनर यापूर्वी लागले आहेत. पण काही झाले का? असे म्हणत माजी आमदार सुभाष भोईर यांचा बॅनर वरून समाचार घेतानाच त्यांनी दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) इच्छुक नेत्यांची ही फिरकी घेतली.

कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील पाटीदार भवन सभागृहात कल्याण लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची शनिवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे (Shrikant Shinde) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात माझे काम असून त्या जोरावर लोक माझा विचार करतील असे, असे म्हणाले.

भावी खासदार या सुभाष भोईर यांच्या बॅनर वरून बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे. स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. विरोधकांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही. पहिल्या निवडणुकीत मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीत साडेतीन लाखांच्या फरकाने जिंकलोय. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय.

हजारो कोटींचा निधी आणलाय अजूनही आणणार. यामध्ये कोणीही इच्छा प्रकट केली, कोणी बॅनर लावले म्हणून खासदार होत नाही. याच्या आधी देखील मोठे बॅनर लावण्यात आले. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून मुख्यमंत्री होत नसतो. संघर्ष करण्याची तयारी पाहिजे लोकांमध्ये जाण्याचे तयारी पाहिजे. मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केले आहे.

मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षात ज्या सुविधा लोकांना मिळाला पाहिजे त्या सुविधा मिळाल्या नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी चार हजार कोटींचे रस्ते हाती घेतले आहेत. शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील पदाधिकाऱ्यापर्यंत शिवसैनिकापर्यंत जनतेपर्यंत पोहोचायचे काम त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.

खासदार शिंदे म्हणाले, यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप (BJP) उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाला त्याचे नाव घ्या...भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय.

जिथे-जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच (Shivsena) खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत. ते जेव्हा-जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT